PNG Sons Sangamner Showroom

पीएनजी सन्सचे संगमनेर दालन

नव्या प्रशस्त वास्तूत

दालनाचे उद्घाटन, ग्राहकांना निवांत दागिने खरेदीचा आनंद घेता येणार

संगमनेर

ग्राहकांना दागिने खरेदीचा आनंद अधिक प्रशस्त जागेत निवांतपणे घेता येण्याच्या हेतूने पु ना गाडगीळ आणि सन्स लि. (पीएनजी सन्स PNG Sons Sangamner Showroom)ने संगमनेर दालन नव्या प्रशस्त वास्तूत स्थलांतरित केले असून, त्याचे उद्घाटन १३ ऑगस्ट २०२१ रोजी संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. या वेळी पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ, संचालक डॉ. रेणू गाडगीळ, संचालक – सीईओ अमित मोडक यांच्याबरोबर सतीश कुबेर, श्रीकांत कुबेर, राहुल शेवकरी, राजेश सोनी व संगमनेर दालनाचे ब्रांच हेड किरण वाणी उपस्थित होते.

पीएनजी सन्सचे नवे भव्य (PNG Sons Sangamner Showroom) संगमनेर दालन नवीन नगर रोडवर पूर्वीच्या दालनाच्या अगदीजवळच आहे. दालन विस्ताराबाबत पीएनजी सन्सचे अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, “आम्ही ऑगस्ट २०१४ मध्ये संगमनेर दालन सुरू केले. गेल्या सात वर्षांत येथील ग्राहकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच ग्राहकांना अधिक चांगल्या पद्धतीने खरेदीचा आनंद मिळावा व दागिन्यांची विविधता अनुभवता येण्यासाठी पीएनजी सन्सने नव्या वास्तूत संगमनेर दालनाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांना नव्या वास्तूत सर्वोत्तम सेवा, दागिन्यांची विविधा मिळेल, असा विश्वास आहे.”

“ग्राहकांच्या सुविधेसाठी दालनाच्या तळमजल्यावर फक्त सोने दागिने तसेच, पहिल्या मजल्यावर डायमंड व चांदी दागिने-वस्तू विभाग केला आहे. दालन प्रशस्त असल्याने येथे सर्वच दागिन्यांची व्हरायटी ही पुणे-मूंबई दालनाप्रमाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी कॅरेटोमीटर उपलब्ध आहे,” असे कंपनीचे संचालक-सीईओ अमित मोडक यांनी सांगितले.

Sangamner PNG Sons
Sangamner New Showroom
PNG Sons Sangamner Relaunch Sangamner 14 August 2021
Sangamner Relaunch Punyanagari 15th August 2021

ग्राहकांना दागिने खरेदीचा आनंद अधिक प्रशस्त जागेत निवांतपणे घेता येण्याच्या हेतूने पु ना गाडगीळ आणि सन्स लि. (पीएनजी सन्स PNG Sons Sangamner Showroom)ने संगमनेर दालन नव्या प्रशस्त वास्तूत स्थलांतरित केले असून, त्याचे उद्घाटन १३ ऑगस्ट २०२१ रोजी संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

×