CSMVS Partners with PNG Sons

CSMVS partners with PNG Sons

CSMVS partners with PNG Sons

Traditional 200 jewellery pieces handcrafted by PNG Sons

India’s first Gallery dedicated for the Indian Jewellery

Pune, 3 March 2020

CSMVS partners with PNG Sons

CMS Partners with PNG & Sons

CMS Partners with PNG & Sons

In bid to showcase our rich heritage to next generations, Chatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalay (CSMVS) opened Money & Traditional Jewellery sections which were inaugurated recently. Mr. Ajit Gadgil, Chairman-Director P. N. Gadgil & Sons Ltd. (PNG Sons), Dr. Renu Gadgil, Director PNG Sons, Sabyasachi Mukherjee, CSMVS Director General, Mr. Shrikant Kuber were present. CSMVS has partnered with PNG Sons for Maharashtrian jewellery.

CSMVS is leading museum of India; to craft an authentic Maharashtrian Jewellery it has partnered PNG Sons as they are known for expertise, excellent craftsmanship, research and PNG Sons also have old dyes as well as their knowledge on traditional jewellery is impeccable. PNG Sons has handcrafted 200 Traditional Maharashtrian Jewellery such as Tanmani, Vjarateek, Taldali Pot (All neck pieces) etc which is displayed in CSMVS Jewellery section.

Commenting on partnering with CSMVS Mr. Ajit Gadgil- Director Chairman PNG Sons said, “We are feeling proud as this is prestigious for us as CSMVS is India’s biggest museum. We have handcrafted all Mahrashtrian jewellery which is kept at here and donated some of the jewellery. Apart from jewellery business, we are committed for Art contribution and we are looking forward to work with CSMVS on new Art Initiative.”

CSMVS has a significant collection of jewellery, built over the years. It comprises of pieces from Harappan, Kausambi, gold and silver from early hoards, royal accoutrements and a vast range of traditional jewellery. This is the only jewellery in India and the first gallery dedicated to showcasing CSMVS jewellery collection. 


छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात महाराष्ट्रीय दागिन्यांना पुणेरी साज

पु. ना. गाडगीळ आणि सन्सने घडविले २०० दागिने

पुणे, ३ मार्च २०२०

देशातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वस्तु संग्रहालयांपैकी एक संग्रहालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयात (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स) महाराष्ट्राच्या दागिने संस्कृतीवर आणि भारतीय चलनाविषयी नवे कलादालान सुरू झाले असून, यामध्ये ठेवण्यात आलेल्या पारंपरिक महाराष्ट्रीय दागिने घडविण्याचा मान केवळ महाराष्ट्रातील पुण्यातील पु. ना. गाडगीळ आणि सन्सला (पीएनजी सन्स - PNG Sons) मिळाला आहे.

या दोन्ही दालनांचे नुकतेच उद्घाटन झाले. त्या वेळी संग्रहालयाचे महासंचालक सब्यासाची मुखर्जी, क्यूरेटर उषा बालकृष्णन व मनीषा नेने, पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे अध्यक्ष-संचालक अजित गाडगीळ, संचालक डॉ. रेणू गाडगीळ, श्रीकांत कुबेर आदी उपस्थित होते.

पु. ना. गाडगीळ आणि सन्सचा (पीएनजी सन्स) दागिन्यांवर असणारा अभ्यास, उपलब्ध असणारी महाराष्ट्रीय दागिन्यांची डिझाइन्स, छाप, कलाकुसर आदींमुळे छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाने पु. ना. गाडगीळ आणि सन्सची (पीएनजी सन्स) महाराष्ट्रीयन दागिने निर्मतीसाठी निवड केली. दोनशेहून अधिक हातघडाईचे दागिने वस्तू संग्रहालयासाठी बनविण्यात आले आहेत. दोनशे वर्षांपूर्वीची वज्रटीक, तन्मणी, तांदळी पोत आदी त्या काही दागिन्यांपैकी काही दागिने येथे पाहायला मिळणार आहेत. भारतीय दागिन्यांचा इतिहास सांगणारी हे पहिलेच संग्रहालय असून, या ठिकाणी हरप्पा, कौसाम्बी या संस्कृतींपासूनचे ते २० व्या शतकापर्यंतचे दागिने ठेवण्यात आले आहेत.

श्री. अजित गाडगीळ म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय देशातील एक मोठे संग्रहालय आहे आणि त्याच्याशी आम्ही जोडले गेलो याचा अभिमान आहे. वस्तू संग्रहालयातील सर्व महाराष्ट्रीयन दागिने आम्ही घडविले आहेत. तसेच, काही दागिने आम्ही संग्रहालयास भेट दिले आहेत. आम्ही दागिने व्यवसायाबरोबर कलेसाठी पुढाकार घेतो आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाबरोबर अनेक चांगल्या गोष्टी करण्याची संधी मिळणार आहे.”

×