Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition in Pune

P. N. Gadgil & Sons Art Initiative, Zapurza is bringing heritage of Indian art to Pune

Pune 24th October 2018

In bid to enrich our society, P. N. Gadgil & Sons Art Initiative & Zapurza- Creative Hub is organizing Raja Ravi Varma’s Lithographs exhibition in Pune. A tribute to Raja Ravi Varma exhibition will be held at Balgandharva Rangamandir’s Kaladalan (art gallery) from 27 to 31 October from 11 am to 8 pm. Inauguration will take on 26th October at 5pm.

Explaining the concept behind this exhibition, Mr. Ajit Gadgil, Founder of Zapurza said, “Today’s generation has a limited knowledge of Raja Ravi Varma who gave an identity to Indian Paintings. To educate people about this heritage, we are hosting Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition. And more than 100 lithographs on Ramayan, Mahabharat, god-goddess & other mythology subjects along with prints of Raja Ravi Press, various labels, Idols, Matchboxes & Calendars will be displayed.”

“Ravi Varma had imported printing press and technicians from Germany and set up the printing press in Mumbai at Girgaon in 1894. Popular painting, Printing process of this press started with Birth of Shakuntala and it will be a part of this exhibition. Ravi Varma has painted Goddess Laxmi, Sarsawati which are still popular and was also printed here. This would be the first of its kind exhibition where all lithographs of Ravi Varma will be displayed,” Mr. Gadgil Mentioned.

Exhibition highlights
Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition will highlight on Lithography technology. And old Lithography stone along with rare lithograph which was printed in 1888 will also be a part of this exhibition. Artist Ajay Deshpande, Aditya Shirke will give demo on figurative art on 27-28th October.

रवि वर्मांच्या दुर्मीळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन

पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह, ‘झपूर्झा’तर्फे आयोजन
पुणे, 24 ऑक्टोबर 2018
भारतीय चित्रकलेला जागतिक ओळख देणारे महान चित्रकार राजा रवि वर्मा (Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition) यांनी काढलेल्या चित्रांच्या ओलियोग्राफचे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह आणि झपूर्झा-क्रिएटिव्ह हबच्या सहकार्याने पुण्यात होत आहे. बालगंधर्व रंगमंदीर कलादालनात 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ‘ए टू ट्रिब्यूट राजा रवि वर्मा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांना अत्यंत दुर्मीळ कलाकृती पाहण्याची संधी मिळेल. प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, 26 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता उद्घाटन आहे.

प्रदर्शनाबाबत झपूर्झा-क्रिएटिव्ह हबचे संस्थापक व कला रसिक श्री. अजित गाडगीळ म्हणाले, की आजच्या पिढीला राजा रवि वर्मा यांनी निर्माण केलेल्या कला वारशाची ओळख व्हावी, या हेतूने हे प्रदर्शन भरवीत आहोत. प्रदर्शनात राजा रवि वर्मांची आणि रवि वर्मा प्रेसची शंभरहून अधिक मुद्राचित्रे मांडली जातील. यात रामायण, महाभारत, पौराणिक कथा व विविध देवी-देवतांची मुद्राचित्रे असतील. तसेच, त्यांच्या चित्रांवर आधारित काडेपेटीचे छाप, निरनिराळी लेबल्स, मूर्ती, कॅलेंडर्स यांचाही समावेश असेल. राजा रवि वर्मा यांच्या चित्रांपासून प्रेरणा घऊन चित्रकारिता सुरू केलेले चित्रकार म. वि. धुरंधर, श्री. माळी यांचीही मुद्राचित्रे Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition येथे असतील.

जानेवारी १८९४ मध्ये रवि वर्मा यांनी जर्मनीतून प्रिंटिंग प्रेस आणि तंत्रज्ञ बोलावून मुंबईत गिरगाव येथे रवि वर्मा प्रेसची स्थापना केली. “बर्थ ऑफ शकुंतला” (शकुंतला जन्म) हे इथे छापलेले पहिले चित्र आणि तेही या प्रदर्शनात असणार आहे. तसेच, त्या पाठोपाठ लक्ष्मी आणि सरस्वती या चित्रांचीही निर्मिती झाली आणि आजही ही चित्रे लोकप्रिय आहेत. विविध मुद्राचित्रे एकाच ठिकाणी पाहायला मिळणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे, असे क्यूरेटर विक्रम मराठे यांनी सांगितले.

दुर्मिळ लिथोग्राफचे मोठे कलेक्शन
प्रदर्शनात लिथोग्राफी तंत्राची माहिती दिली जाईल. तसेच, पुण्यात 1888 मध्ये छापण्यात आलेला दुर्मीळ लिथोग्राफ व लिथोग्राफीची शिळाही असेल. तसेच, रवि वर्मांच्या संदर्भातील सर्व छायाचित्रे प्रदर्शनात असतील. (Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition) प्रदर्शनादरम्यान 27 व 28 ऑक्टोबर रोजी अजय देशपांडे, आदित्य शिर्के हे व्यक्तिचित्रांचे प्रात्यक्षित सादर करणार आहेत, असे मुख्य क्यूरेटर दिलीप जोशी यांनी सांगितले.

×