Panipat Movie Jewellery Exhibition

Panipat

पानीपत चित्रपटाच्या दागिन्यांचे

पु. ना. गाडगीळ आणि सन्समध्ये प्रदर्शन

पुणे 19 नोव्हेंबर 2019

 

मराठा साम्राज्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पानीपतच्या तिसऱ्या युद्धावर बनविण्यात आलेल्या पानीपत चित्रपटाचे दागिने घडविण्याचा मान फक्त पु. ना. गाडगीळ आणि सन्सलाच मिळाला आहे. चित्रपटच्यानिमित्ताने पानीपत चित्रपटात वापरण्यात आलेले पारंपरिक शैलीचे दागिने पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे औंध, हॅपी कॉलनी आणि सातारा रोड येथील दालनांत प्रदर्शन होत आहे.  

पहिले प्रदर्शन औंधमधील वेस्टंड सेंटर वनमधील रिलायन्स मार्टशेजारील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या दालनात 19 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर, त्याचे उद्घाटन मंगळवारी झाले. प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8.30 दरम्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. तसेच, आगामी काळात हॅपी कॉलनी-कोथरूड 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर आणि सातारा रोड (वाळवेकरनगर) येथील दालनात 4 डिसेंबर ते 22 डिसेंबरदरम्यान पानीपत दागिने प्रदर्शन होणार आहे.

प्रदर्शनाबाबत पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे संचालक व अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, “चित्रपटाचे दागिने हे महाराष्ट्रीय शैलीबरोबरच उत्तरेकडील शैलीतील असून, दागिन्यांसाठी विशेष संशोधन केले आहे. हे दागिने विविध राज्यांतील आमच्या कारागीरांनी घडविले आहेत. सोन्याबरोबर कुंदन, मोती आणि विविध रंगांच्या स्टोन्सचा वापर दागिन्यांत आहे.”      

“पारंपरिक मराठा व पेशवाई शैलीचे उत्तम कलाकुसरीचे दागिने घडविण्याचा हातखंड पु. ना. गाडगीळ आणि सन्सचा असल्याने आम्ही पानीपतसाठी पु. ना. गाडगीळ आणि सन्सची निवड केली, ” असे आशुतोश गोवारीकर यांनी ट्विट केले होते.    

दागिन्यांबाबत पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे सीएफओ व विक्रीप्रमुख आदित्य मोडक म्हणाले, “चित्रपटासाठी आठशेहून अधिक विविध प्रकारचे दागिने घडविले असून, नेकलेस, बांगड्या, डोक्यातली फुले, अंगठ्या, कंबरपट्टे, शिरपेच, वाक्या, कडे आदी दागिने आहेत. प्रदर्शनातील दागिन्यांवरून खरेदीसाठी ऑर्डरही देता येईल.”

 

 

Panipat Movie Jewellery

Exhibition by P. N. Gadgil & Sons

Pune 19 November 2019

 

P. N. Gadgil & Sons is proud to announce that it has designed the authentic traditional jewellery for Panipat Movie which is based on 3rdbattle of Panipat. And on the occasion of movie release P. N. Gadgil & Sons is hosting exhibitions of Panipat Movie jewellery.

Exhibition will be held at P. N. Gadgil & Sons Aundh showroom - Westend Center One (19 November to 1 December) Next to Reliance Mart, Happy Colony- (26 November to 8 December) Kothrud, Satara Road (4 to 22 December) Walvekar Nagar Showroom and it will remain open from 11 am to 8.30 pm.

Commenting on the exhibition Mr. Ajit Gadgil, Chairman-Director, P. N. Gadgil & Sons said, “We have done extensive research on jewellery as it is periodic movie and it has Maharashtrian and North Indian style jewellery. Our artists based in various states of India were involved making of jewellery. We have used various Colour Stones, Pearls and Kundan apart from gold.”

Ashutosh Gowarikar has already Twetted that, “For Panipat movie we couldn’t have had a better partner than P. N. Gadgil & Sons. Their Jewellery designs and creation of Peshwa & Maratha Jewellery is Authentic and grand.”

“We have made more than 800 authentic designs of Panipat Jewellery and to name few so such as Necklaces, Bangles, Armlets, Earrings, Finger Rings, Bracelets, waistbands etc. Customers can place the jewellery replica order in the exhibition,” Aditya Modak, CFO and Sales Head, P. N. Gadgil & Sons mentioned.

×