Matchboxes Exhibition in Pune

Rare matchboxes exhibition in Pune
By PNG & Sons Art Initiative

Pune 7th June 2018

As a part of P N Gadgil & Sons art initiative, we are hosting matchboxes exhibition for the first time in pune. And we will be showcasing rare matchboxes collected from India, Russia, Germany, Japan and Europe. Matchboxes have images prints such as Fruits, Flowers, Vegetables, Musical instruments, Costumes, celebrities and most of the matchboxes are 50 to 80 years old.

Even, few matchboxes have Raja Ravivarma’s paintings images are displayed. This rare matchboxes exhibition will remain open till 1st July 2018 from 11 am to 8 pm (Monday Closed) at Happy Colony PNG & Sons showroom art gallery. These rare matchboxes collection is part of personalized collection of Govind Gadgil, Chairman, P N Gadgil & Sons Ltd.

Venue : P N Gadgil & Sons ltd Happy Colony showroom, Kothrud
Timing : 11 am to 8 pm (Monday Closed)
Dates : 7th June to 1st July 2018

पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत आयोजन
कोथरूडमधील हॅपी कॉलनी दालनात काडेपेटी प्रदर्शन (Matchboxes Exhibition) 1 जुलैपर्यंत खुले

पुणे 7 जून 2018

पुण्यात नेहमीच वेगवेगळी प्रदर्शने होत असतात. पण, त्यात प्रामुख्याने चित्र, छायाचित्र वा म्यूरल प्रदर्शनांचा समावेश सर्वाधिक असतो. पण, आपल्याकडील कलावस्तू सोडून अमूल्य ठेव्यांची प्रदर्शने फार कमी होत असतात. त्यामुळेच आपल्याकडील असा ठेवा सर्वांना पाहता येण्यासाठी पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्हअंतर्गत (P N Gadgil & Sons Art Initiative) काडेपेटी (Matchboxes Exhibition) म्हणजेच मॅचबॉक्सचे प्रदर्शन पुण्यात भरविले आहे.

कोथरूडमधील हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या (Happy Colony PNG & Sons) दालनातील आर्ट गॅलरीत प्रदर्शन सुरू झाले आहे. प्रदर्शन सोमवार वगळता सर्वांना विनाशुल्क सकाळी 11 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत पाहण्यासाठी 1 जुलैपर्यंत खुले राहणार आहे. प्रदर्शनात भारत, रशिया, जपान, जर्मनी व युरोपातील विविध देशांमधील तब्बल पाचशे जुन्या काडेपेट्या पाहायला मिळणार आहेत

यात नावजलेल्या व्यक्ती (राजकीय, कलाक्षेत्र), फळे, फुले, भाज्या, वाद्य, पेहराव आदी छापांच्या काडेपेट्यांचा (Matchboxes) समावेश आहे. यातील बहुतेक काडेपेट्या या सुमारे पन्नास ते ऐंशी वर्षांपूर्वीच्या आहेत. राजा रविवर्मा यांनी काढलेली चित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही निवडक चित्रांचे छाप हे काडेपेट्यांवरही छापण्यात आले होते. या प्रदर्शनात अशा तसेच, अन्य दुर्मिळ काडेपेट्याही आहेत.

स्थळ : पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. हॅपी कॉलनी दालन
वेळ : सकाळी 11 ते सायंकाळी 8 (सोमवारी बंद)
कालावधी : 7 जून ते 1 जुलै 2018

×