Initiative for a nutritious diet PNG and Sons

पीएनजी सन्सचा पोषक आहारासाठी पुढाकार

पुणे जिल्ह्यातील पाच ग्रामपंचयतीमधील गरजूंना व लहान मुलांना पोषक आहारातील घटक मिळावे या हेतूने पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने सामाजिक बांधिलकी उपक्रमा अंतर्गत ५०० लिटर दूध वाटपाचा उपक्रम हाती घेतली आहे. अक्षय तृतीया म्हणजे १४ मेपासून याची सुरवात झाली असून, ३१ ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम चालविला जाणार आहे. काही हजार गरजूंना या उपक्रमाामुळे फायदा होणार आहे. पी. एम. डी. मिल्क अँड फूड्सच्या माध्यमातून पिंपळी ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी पिंपळीच्या सरपंच मंगल केसकर यांच्यासह सुनील बनसोडे, प्रसिद्धी प्रमुख आबासाहेब देवकाते, स्वाती ढवाणपाटील, अजित थोरात, नवनाथ देवकाते आदी उपस्थित होते. बिजवडी या गावातही हा उपक्रम नुकताच सुरू झाला.