Annapurna Sadan is now Functional with support of PNG Sons
To uplift the life of orphanage children, PNG Sons a Leading Jewellery of India had taken a responsibility to build 2000 Sq. Ft. dining hall (Annapurna Sadan) at Sahara Anathalay (Gevrai, near Beed), which is run by Balgram NGO. The ground breaking ceremony (bhumi puja) was done at the hands of Shri Ajit Gadgil, Director-Chairman PNG Sons on 21st July 2017. In less than a two years dining hall building facility is now fully functional and inauguration ceremony of the same facility was held at the hands of Dr. Ravindra Kolhe & his wife Dr. Smita Kolhe recently. Mr. Santosh Garje- Founder of Sahara Anathalay, Mr. Satish Kuber from PNG Sons along with other dignitaries was present. Sahara Anathalay of Balgram has adopted 100 Orphan Children.
अन्नपूर्णा सदन कार्यान्वित
अन्नपूर्णा सदन कार्यान्वित; ‘पीएनजी सन्स’चे सहकार्य निराधार मुलांचे संगोपन चांगले होण्याच्या उद्दिष्टाने पु. ना. गाडगीळ आणि सन्स (पीएनजी सन्स) यांनी बीडजवळील गेवराई येथील सहारा अनाथालयातर्फे संचालित होत असलेल्या बालग्राममध्ये दोन हजार चौरस फुटांचे अन्नपूर्णा सदन (भोजनालय) उभारण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. २१ जुलै २०१७ रोजी पीएनजी सन्सचे संचालक-अध्यक्ष श्री. अजित गाडगीळ यांच्या हस्ते भूमी पूजन झाले. दोन वर्षाच्या आत अन्नपूर्णा सदन उभे राहिले असून, त्याचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रविंद्र कोल्हे व त्यांची पत्नी डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी सहारा अनाथालयाचे संस्थापक संतोष गर्जे, पीएनजी सन्सचे श्री. सतीश कुबेर आदी उपस्थित होते. सहारा अनाथालय शंभर निराधार मुलांचे संगोपन करीत आहे.