Corporate Social Responsibility
March 15, 2018Painting Exhibition at Jalgaon PNG & Sons
April 2, 2018पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.तर्फे
लाईट वेट ब्यूटी कलेक्शन सादर
पुणे : व्हरायटी ईज एव्हरिथिंग हे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे सूत्र असल्याने सतत दागिन्यांची नवीन कलेक्शन्स ग्राहकांना सादर केली जातात. या गुढीपाडव्यासाठी खास 18 कॅरेटमध्ये सीझेड (क्यूबिक झिरकोनिया) या खड्यांमधील दागिन्यांचे लाईट वेट ब्यूटी (PNG & Sons Light Weight Beauty), हे सुपर फिनिश्ड कलेक्शन सादर केले आहे. सीझेड खड्यांमुळे या दागिन्यांचे सौंदर्य खुलते व ते अत्यंत चमकदार दिसतात. दागिन्यांचे हे कलेक्शन फक्त चार हजार रुपयांपासून उपलब्ध असून, कर्णफुले, मंगळसूत्र पेंडंट, पेंडंट्स यामध्ये आहेत. आपल्याकडे पहिल्यांदाच असे कलेक्शन सादर झाले असून, त्यास उत्तम प्रतिसाद आहे. हे दागिने सण-समारंभ व रोजच्या वापरासाठी उत्तम असून, सर्व प्रकारचे कपडे व रंगसंगतीवर खुलून दिसतात.

Light Weight Beauty by PNG & Sons
यापूर्वी सादर केलेल्या उत्सव विविधतेचा, फेस्टिव्हल ऑफ डायमंड्स, लँटर्न कलेक्शनला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आता या कलेक्शन्सबरोबर लाईट वेट ब्यूटी (Light Weight Beauty) हे कलेक्शन आमच्या सर्व दालनांत पुणे (सातारा रोड, औंध, हॅपीकॉलनी (कोथरूड), सिंहगड रोड, चिंचवड व भोसरी), तर अमरावती, बीड, नाशिक, नाशिक रोड, नारायणगाव, नंदूरबार, पंढरपूर, सोलापूर, सातारा, संगमनेर, शिरूर, धुळे, कलबुर्गी (कर्नाटक), प्रभादेवी-मुंबई, वडोदरा (गुजरात), जळगाव, वर्धा, परभणी व उस्मनाबाद येथील उपलब्ध आहे. बदलती आवड, बदलत्या शैली यांच्या अभ्यास करून नव्या तंत्राच्या साह्याने हे कलेक्शन सादर केले आहे. सर्व वयोगटाला साजेसे असे हे लाईट वेट ब्यूटी कलेक्शन आहे, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.चे अजित गाडगीळ यांनी सांगितले.